News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या ओरायन मॉलतर्फे १४ सप्टेंबर रोजी मोदक स्पर्धेचे आयोजन .... सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकरची उपस्थिती

पनवेलच्या ओरायन मॉलतर्फे १४ सप्टेंबर रोजी मोदक स्पर्धेचे आयोजन .... सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकरची उपस्थिती

पनवेल- पनवेलच्या ओरायन मॉलतर्फे मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.नवी मुंबई, रायगडकरांसाठी होत असलेली ही स्पर्धा १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ओरायन मॉल येथे होणार आहे.
ओरायन मॉल हे नुसते खरेदीचे ठिकाण नसून येथे स्थानिक संस्कृती व परंपरा जोपासण्याचे ही काम केले जाते.ओरायन मॉल संपूर्ण वर्षभर लोकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या कलेला वाव मिळण्यास उद्युक्त करते.दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणपती आगमनाचे निमित्त साधून सर्व नवी मुंबई,रायगडवासियांसाठी "मोदक स्पर्धा"आयोजित करीत आहे.ह्यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री "दिव्या पुगावकर" पाहुणे म्हणून या उपस्थित राहणार आहेत.मोदक हा नुसता एक खाद्यपदार्थ नसून तो एक भक्ती,परंपरा आणि भावनेचे प्रतीक आहे.गणेश चतुर्थीला गणपतीसाठी केलेला प्रसाद "मोदक" आता संपूर्ण जगभर एक आवडता पदार्थ म्हणून पोहोचलेला आहे.२०१७ मध्ये ओरायन मॉल सुरू झाल्यापासून मोदक स्पर्धा ही स्थानिक गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव मिळवून आपली कला लोकांपर्यंत पोहोचविण्याची एक उत्तम संधी आहे.दरवर्षी ५० हून अधिक सहभागीना ह्या उपक्रमात भाग घेऊन आपल्या पाक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचे संधी मिळते. ही केवळ नुसती स्पर्धा नसून आपल्या पाककलेचा वारसा व आपले कौशल्य लोकांपुढे ठेवण्याची एक संधी आहे.प्रत्येक व्यक्तीची पदार्थ बनवण्याची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत असते व त्यात असलेले वेगवेगळे घटक व त्यांचे अनोखे मिश्रण आपल्या स्वतःच्या पद्धतीने बनवून प्रत्येकाचा मोदक हा वेगळा बनतो.पारंपारिक उकडीचे मोदक व नवनवीन फ्लेवरचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून स्पर्धक या उपक्रमास एका अतिउच्च शिखरावर पोहोचवतात.
ओरायन मॉल स्थानिकांच्या कलागुणांना वाव देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे.अशा ह्या उपक्रमास अनेक स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आम्हाला त्याचा अभिमान आहे व या वर्षी सुद्धा अशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे.तुम्ही एक उत्तम मोदक बनवणारे असाल अथवा जिभेचे चोचले पुरवणारे असाल व खाद्यप्रेमीअसाल तर ओरायन मॉलची ही मोदक स्पर्धा प्रत्येकासाठी काहीतरी खास घेऊन येईल.आम्ही आपणास आव्हान करीत आहोत की  ह्या स्पर्धेसाठी आणि या रायगडच्या प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशनमध्ये असलेल्या परंपरा,नाविन्य आणि सामुदायिक भावनेचे साक्षीदार व्हा,आपली आपली कला,चव,मजा आणि उत्साहाने भरलेल्या या उपक्रमासाठी १४ सप्टेंबरला ह्या उपक्रमामध्ये सामील व्हा असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 8850923411 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment