News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित पनवेलजवळील पारगांव-डुंगी गावातील १११ कुटुंबासाठी सिडकोकडून तात्पुरत्या स्थलांतरणासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयाचे धनादेश ....अनुदानाची रक्कम पनवेलचे तहसिलदार विजय पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थांना अदा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित पनवेलजवळील पारगांव-डुंगी गावातील १११ कुटुंबासाठी सिडकोकडून तात्पुरत्या स्थलांतरणासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयाचे धनादेश ....अनुदानाची रक्कम पनवेलचे तहसिलदार विजय पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थांना अदा

पनवेल: - पनवेलजवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित पारगांव-डुंगी गावातील ग्रामस्थांचे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी होवू नये म्हणून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अंतर्गत मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्थलांतरणासाठी १११ कुटुंबासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे सिडको विभागाकडून अनुदान देण्यात आले आहे.सदर अनुदानाची रक्कम पनवेल तहसिलदार विजय पाटील यांच्या पुढाकाराने संबंधित ग्रामस्थांना अदा करण्यात आली.यासाठी तहसीलदार विजय पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता.याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदारांचे आभार मानले. 

दरवर्षी पावसाळ्यात नवी मुंबई विमानतळबाधित पारगाव व डुंगी गावात पावसाचे पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते.विमानतळाच्या भरावामुळे नदीचे पात्र वळवल्यामुळे नदीचे पाणी गावात शिरते.यामुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत असून येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पुनर्वसनाबाबत डुंगी गाव प्रस्तावित आहे.याबाबत सिडकोकडे यापूर्वी प्रस्ताव देखील देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी सिडकोकडून यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रकल्पबाधित कुटुंबांना विनाविलंब अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. 
डुंगी,पारगाव येथील शेतजमिनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित झाल्या असून जमिनीचा संपूर्ण ताबा सिडकोकडे देण्यात आला आहे. याबाबत भूखंड वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने मागील ५ ते ६ वर्षांपासून पारगाव व डुंगी गावचे पुनर्वसन रखडलेले आहे.या धर्तीवर पावसाळ्यात पावसाळ्यात डुंगी,पारगाव गावामध्ये पाणी शिरून जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये,या अनुषंगाने पावसाळ्यातील तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपये अनुदान देण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment