पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागून पाच वाहने जळून खाक झाली. त्यामुळे लाखोंची वित्तहानी झाली असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.पनवेल तालुक्यातील कोळखे गावानजीक महिंद्रा हे चारचाकी वाहने विक्रीचे शोरूम आहे.याठिकाणी नवीन गाड्या विक्रीसोबत ग्राहकांच्या गाड्या दुरुस्त केल्या जातात.या शोरूममधून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले.त्यावर जागरूक नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून पाचारण केले.काही क्षणातच पनवेल महानगरपालिका आणि सिडको अग्निशमन दल सदर ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत या आगीत पाच महागड्या गाड्या जळून खाक झाल्या होत्या तर एक गाडी अर्धवट जळाली होती तर शोरूमला देखील आगीने भक्षस्थानी केले होते.त्यामुळे लाखोंची वित्तहानी झाली.परंतु सुदैवाने जिवीत हानी झाली नसल्याची माहिती पनवेल महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांनी दिली. या आगीचे वृत्त समजताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पण आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नव्हते.अधिक तपास पनवेल शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Post a Comment