पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांना आयुक्तांची भेट .... महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना
पनवेल -: पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांना आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागांना भेट देऊन सोयीसुविधांचा आढावा घेतला.
महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर 20 येथील मच्छी मार्केट करिता जागा उपलब्ध करण्याच्या हेतूने या जागेची पहाणी आयुक्तांनी केली तसेच खारघर सेक्टर 36 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी करून आयुक्तांनी कामाजाचा आढावा घेतला.याचबरोबर आरक्षित भूखंड क्र. 17 तसेच खारघर महापौर बंगल्याचे काम सुरू आहे.या बांधकाम साईटला आयुक्तांनी भेट देऊन कामाची पहाणी केली.याचबरोबर खारघरमधील सेक्टर 20ची पहाणी केली.
याचबरोबर महापालिका कार्यक्षेत्रातील धानसर, किरवली, तुर्भे, पिसार्वे, करवले इत्यादी गावांची पहाणी करून तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला.
यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे,कार्यकारी अभियंता संजय कटेकर,मालमत्ता विभागप्रमुख जयराम पादीर, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी व कर्मचारी उपस्थित होते.
याचबरोबर कृष्णाळे तलाव परिसराची पहाणी केली तसेच नाट्यगृहालगत पार्किंगचे काम सुरू आहे त्याची पहाणी करून सूचना दिल्या.नूतन गुजराती शाळा, दि.बा.पाटील शाळांना भेटी दिल्या.याचबरोबर आदई सर्कल येथे होते आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट ॲकेडमीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे,या कामाची पहाणी करून कामकाजाचा आढावा घेतला तसेच वडाळे तलाव परिसराची देखील पहाणी केली.
खांदा कॉलनीच्या ब्रीजला लागून पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाची भव्य दिव्य ‘स्वराज्य’ इमारत उभारली जात आहे.या मुख्यालयाच्या कामाची पहाणी करून आयुक्तांनी आढावा घेतला.यावेळी महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
Post a Comment