जासई येथे स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांना अभिवादन करून संजोग वाघेरे-पाटील यांचा उरण तालुक्यात प्रचारदौरा.... महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
उरण- मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील जासई येथून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उरण तालुका प्रचार दौरा आज सुरु झाला.स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून जासईपासून प्रचारास सुरुवात करण्यात आली.
या प्रचार दौऱ्यात संपूर्ण उरण तालुका पिंजून काढण्यात येणार आहे.जासईपासून धुतुम, वेश्वी, दिघोडे, चिरनेर, वशेणी, आवरे,गोवठणे, भेंडखळ, नवघर, पागोटे, सोनारी,पाणजे, बोकडविरा, नविनशेवा, करंजा, नागाव, केगाव व शेवटी उरण शहर वैष्णवी हॉटेल ते कोटनाका अशी रॅली करून उरण तालुका प्रचार दौऱ्याची सांगता होणार आहे.या प्रचार दौऱ्यामधे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, शिवसेनेचे जेष्ठ नेते बबनदादा पाटील,माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शेकापचे प्रितम म्हात्रे, कॉंग्रेसचे आर.सी.घरत, कॉ.भूषण पाटील, सर्व महिला आघाडीच्या नेत्या तसेच मोठ्या संखेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा उस्फुर्त पाठींबा पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.
Post a Comment