News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रवाशांच्या मागणीनुसार नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्याची माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची सिडकोकडे मागणी ...विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करा

प्रवाशांच्या मागणीनुसार नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्याची माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची सिडकोकडे मागणी ...विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करा

पनवेल - प्रवाशांच्या मागणीनुसार नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करावी तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करा अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात,सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन प्रशासकीयस्तरावर प्रयत्न करत आहे.
खारघर तसेच परिसरातील इतर सेक्टर व गावातील रहिवाशांना नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यामुळे प्रवासाची अजून एक सुविधा उपलब्ध झाली आहे.परंतु मेट्रोच्या तिकीट दरात कपात करणे गरजेचे आहे.यासाठी अनेक प्रवाशांनी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्याकडे विनंती केली आहे.सद्यस्थितीला असणारे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाहीत. 

खारघर शहराची शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण झाली आहे.या ठिकाणी विविध नामांकित वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनियरिंग,मॅनेजमेंट,फॅशन डिझाइनिंग असे अनेक महाविद्यालय या ठिकाणी आहेत व या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे खारघरला येत असतात.नवी मुंबई मेट्रो स्टेशन हे बहुतांश ह्या महाविद्यालयांच्या जवळपास त्यांची स्थानके आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ते सोयीचे होते विद्यार्थी वर्गाकडून देखील मासिक पाच योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करेल. वरील सर्व गोष्टींचा विचार करता आपण नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करावी ही मागणी पत्राद्वारे माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment