पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी घेतला विकास कामांचा आढावा ...पावसाळापूर्व कामे तातडीने सुरू करण्याच्या सुचना
पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यालयात झालेल्या बैठकित प्रभारी आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी घेतला.यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभागास दिल्या तसेच पावसाळापुर्व कामे तातडीने सुरू करण्याच्याविषयी आयुक्तांनी संबधित विभागास सांगितले.
यावेळी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड,उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड ,सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे ,लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक अधिकारी स्वरूप खारगे, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, धोकादायक स्थितीतील झाडांची व फाद्यांची छाटणी करणे अशा पावसाळापूर्व कामांना तातडीने सुरूवात करण्याबाबत सूचना संबधित विभागास दिल्या. नालेसफाईच्या कामाचे वेळापत्रक तयार करण्याबाबत सांगितले.धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याविषयी संबधित विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या.
नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्थेबाबत आढावा घेऊन उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बांधकाम विभागास दिल्या. तसेच देहरंग धरणातील पाण्याबाबत आढावा घेऊन उन्हाळ्यातील पाणीपुरवठाबाबत आयुक्तांनी चर्चा केली.
यावर्षी विक्रमी मालमत्ता कर वसूल केल्याबाबत मालमत्ता कर विभागाच्यावतीने सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी नवीन प्रत्यायोजन आदेशाबाबत चर्चा करण्यात आली.
लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवरती होर्डिंग्ज काढण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्राच्या डागडूजीबाबत चर्चा करण्यात आली. याबरोबरच निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदानादिवशी दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर्स खरेदी करण्याबाबत आयुक्तांनी चर्चा करण्यात आली.
Post a Comment