पनवेल शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयालगत रिक्षा स्टॅन्डला परवानगी देऊ नये : भीमशक्ती संघटनेची पनवेल आरटीओकडे मागणी
पनवेल - पनवेल शहरात हायवेलगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा लगत रिक्षा चालक रिक्षा लागत आहे.या स्टॅन्ड तेथील परिसरात घाण केली जाते त्यामुळे येथील परिसर खराब होत असल्याने येथे रिक्षा स्टॅन्डला परवानगी देऊ नये अशी मागणी भीमशक्ती संगठनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी पनवेल आरटीओकडे केली आहे .
पनवेल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ,रिक्षा चालक मालक रिक्षा स्टॅन्ड ची मागणी पनवेल आर टी ओ कडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे.या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला भिम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी चैत्य भूमीकडे जाताना येथे येत असतात,अनेक राजकीय व्यक्ती मोठ्या प्रमाणात येत असतात.त्यामुळे येथे सातत्याने वर्दळ असते सदरील पुतळयालगत रिक्षा स्टॅन्डला परवानगी दिल्यास मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होवू शकतात. तसेच पुतळयाच्या सभोवताली असलेल्या लोखंडी कंपाऊंडची नासधुस होवू शकते. महापालिकेने केलेल्या सुंदर अशा शुशोभीकरणाला बाधा येऊ शकते येथे भविष्यात या ठिकाणी कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड ला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी भीम शक्ती संगठनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड शासकीय यंत्रणेला निवेदन देऊन केली आहे .
Post a Comment