मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना उरण विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांची आघाडी देणार - कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत
उरण- मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना उरण विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांची आघाडी देणार असल्याचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण तालुक्यातील जासई येथे सांगितले
स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात जासई येथून करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी,दोनवेळा मावळचे खासदार असलेले श्रीरंग बारणे हे स्थानिकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. केंद्राच्या DPD धोरणामुळे पंधरा ते विस हजार तरुणांना रोजगार गमवावे लागले.उरण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे, उरणला सुसज्य हॉस्पिटल नाही, नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. विविध पोर्ट मध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती होत आहे त्याच्यावर खासदार तोंड उघडायला तयार नाहीत. उलट JNPT चा CSR फंड हा RSS च्या संघटनांना परस्पर दिला जातो स्थानिकांसाठी फंड वापरला जात नाही.
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना व बिजेपी एकत्र असून सुद्धा पार्थ पवारांना बरोबरीची मते मिळाली होती.आताच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा गट ) महाविकास आघाडीत आहे,त्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांना ५० हजारांची आघाडी उरण विधानसभेतून मिळेल असे भाकीत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी प्रचाराप्रसंगी केले.संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार रॅलिसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेचे जेष्ठ नेते बबन पाटील,मा.आ.मनोहरशेठ भोईर,शेकाप नेते मा.आ. बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, रवि घरत,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील,कॉंग्रेस पक्षाचे श्री.मिलिंद पाडगांवकर,मार्तंड नाखवा,किरीट पाटील,अखलाख शिलोत्री, विनोद म्हात्रे, संजय ठाकूर,रेखा घरत, निर्मला पाटील, विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, आदित्य घरत, विवेक म्हात्रे, तसेच शेकडोंच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment