मावळ,रायगडच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणार - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत
पनवेल- मावळ,रायगडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचाराला लागले असून मावळ,रायगडच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणार असल्याचे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर येथे मावळ,रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीच्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.मलाही भाजप पक्षात येण्याची ऑफर आली होती परंतु मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे यावेळी महेंद्र घरत यांनी सांगितले.
यापुढे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महेंद्र घरत म्हणाले की, लोकशाही धोक्यात आहे,ही लोकसभा निवडणूक हुकुमशाही विरोधात लढाई आहे.जनता भाजपा विरोधात आहे.मोदी सरकार विरोधात राग आहे. जनतेचे सरकार आले पाहिजे, यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ, रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जोरात प्रचाराला लागले आहेत, त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेत येणार आहे.महागाई, बेरोजगार,महिलांचे प्रश्न याबाबत प्रचंड असंतोष आहे.काँग्रेसच्या वचननामा बाबत बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेसा वचननामा हा जनतेचा वचननामा आहे.मी महाराष्ट्राच्या प्रचार समितीमध्ये असून जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत तेथे तेथे मी प्रचाराला जात असल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर धनराज मुंगाजी,डॉ.मनीष पाटील,विनोद म्हात्रे,रायगड जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, कामगार नेते वैभव पाटील, किरीट पाटील आदी उपस्थित होते.
Post a Comment