मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे- पाटील उमेदवार....खरी लढत या दोघांमध्येच होणार!घाटमाथ्यावरील उमेदवार,उत्तर रायगडातील मतदार निरुत्साहित
पनवेल- मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे संजोग वाघेरे- पाटील उमेदवार जाहीर झाले आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये खरी लढत या दोघांमध्येच होणार आहे.महायुती आणि महाविकास आघाडीने घाटमाथ्यावरील उमेदवार दिल्याने उत्तर रायगडातील मतदार मात्र निरुसाही आहेत.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दोन वेळा मावळ लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली,आता ते तिसऱ्यांदा या मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील हे पहिल्यांदाच मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील यांच्या उमेदवार निश्चितीमुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पनवेलमध्ये जनसंवाद मेळावा झाला.पनवेलमधील शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत आहे,आपण सर्व शिवसेनेच्या मागे पुन्हा खंबीर उभे राहून येत्या निवडणूकीत मावळचा खासदार शिवसेनेचा निवडून आणणार असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बेलपाडा,खारघर येथे शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या मावळ लोकसभा निवडणूक प्रचार संदर्भात पनवेल,उरण,कर्जत इंडिया आघाडीच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी इंडिया आघाडीचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर झाल्याने निवडणुकीच्या लढतीचे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे.
Post a Comment