News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विरोधात महादेव वाघमारे यांचे उपोषण सुरु..... आप,वंचित बहुजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,शिवसेना ठाकरे गट,अनेक सोसायट्यांचा उपोषणास जाहीर पाठिंबा

पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विरोधात महादेव वाघमारे यांचे उपोषण सुरु..... आप,वंचित बहुजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,शिवसेना ठाकरे गट,अनेक सोसायट्यांचा उपोषणास जाहीर पाठिंबा

पनवेल- पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे हे पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसले आहेत,या उपोषणास आप,वंचित बहुजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,शिवसेना ठाकरे गट,अनेक सोसायट्यांचा उपोषणास जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
महानगरपालिकेने पनवेलमधील मालमत्ताधारकांवर लादलेल्या अन्याय कराच्या वसूलीविषयी सारासार विचार करून पूर्वलक्षी जाचक कर व त्यावरील शास्तीतून पनवेलकरांची मुक्तता करावी व दिलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनपासमोर उपोषणांस आजपासून महादेव वाघमारे उपोषणाला बसले आहेत.विविध मागण्या महादेव वाघमारे यांच्या आहेत 
त्यामध्ये,ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये सिडकोकडून समाविष्ट नागरी भागात कलम 128 अ नुसार विविध सेवा- सुविधा पनवेल महानगरपालिकेने पुरविलेल्या नाहीत त्यामुळे अशी कर आकारणी रद्द करावी, ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमधील निवासी व वाणिज्य मालमत्तावरील वसूल केलेली मालमत्ता करायची रक्कम व्याजासहित मालमत्ता धारकांना परत करावी,1डिसेंबर 2022 पासून मालमत्ता कर आकारणी सुरू करावी व नव्याने बिले पाठवावी,मालमत्ता करावर लागलेला दंड रद्द करा व ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमधील वसूल केलेली शास्ती व्याजासहित परत करावी,ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत मालमत्ता कर वसुलीसाठी निवासी व वाणिज्य मालमत्ता धारकांना पाठवलेल्या जप्तीच्या नोटिसा रद्द करा अशा प्रामुख्याने मागण्या आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment