News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

२ वर्षे बेपत्ता असलेल्या महिलेचा पनवेल शहर पोलिसांनी घेतला शोध ... आजारपणाला कंटाळून घरातून निघून गेल्याचे कारण

२ वर्षे बेपत्ता असलेल्या महिलेचा पनवेल शहर पोलिसांनी घेतला शोध ... आजारपणाला कंटाळून घरातून निघून गेल्याचे कारण

पनवेल दि.१६ (संजय कदम): सलग २ वर्षे बेपत्ता असलेल्या महिलेचा पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात हद्दीतील एक ४० वर्षीय महिला 2 मे 2022 रोजी सुमारास कामाला जात आहे असे सांगून घरातून निघून गेली होती.ती घरी परत न आल्याने तिच्या आईने ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली सपोनि प्रकाश पवार, पोहवा अमोल पाटील,पोना मिथुन भोसले,पोकॉ विशाल दुधे यांच्या पथकाने सदर महिलेचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपास सुरू केला असता ती डोंबिवली येथे असल्या बाबत माहिती मिळताच तिचा डोंबिवली परिसरात शोध घेऊन तिला ताब्यात घेतले व पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर ती तिच्या आजारपणाला कंटाळून घरातून निघून गेली असल्याबाबतचे तिने सांगितले.त्यानुसार तिचा सविस्तर जबाब नोंद केला आहे. त्यानंतर सदर महिलेला तिच्या आईच्या व बहिणीच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment