News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलकरांसाठी वाहनतळ...नाट्यगृहासमोरील जागेत वाहनतळ कामाचे भूमिपूजन... पनवेल शहरात वाहतूक कोंडीला बसणार आळा

पनवेलकरांसाठी वाहनतळ...नाट्यगृहासमोरील जागेत वाहनतळ कामाचे भूमिपूजन... पनवेल शहरात वाहतूक कोंडीला बसणार आळा

पनवेल -पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा धडाका सुरु आहे.त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील जागेत (प्रॉर्पटी क्र. १५६८, १५७२ ) ९७ लाख ७७ हजार ४९७ रुपयांच्या निधीमधून पार्किंग विकसित करण्यात येणार आहे.या कामामुळे पनवेल शहरात होणारी वाहतुक कोंडीला आळा बसणार आहे.या कामाचे भाजप शहराध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक राजू सोनी,दर्शना भोईर,रुचिता लोंढे,भाजपा युवा नेते केदार भगत,सुमित झुंजारराव,महिला आघाडीच्या समता पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परेश ठाकूर म्हणाले,शहरात वाहनतळ विकसित होण्यासाठी आम्ही गेली चार वर्षे पाठपुरावा केला,या वाहनतळाचा निश्चितच पनवेलकरांना फायदा होईल.ठिक-ठिकाणी रस्त्यावर उभे असलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते पण ही वाहतूक कोंडी या वाहनतळामुळे दूर होईल असे त्यांनी सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment