पळस्पे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन .... ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव,अभिनंदनाचा वर्षाव
पनवेल- पनवेल तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे.आयएसओ मानांकन मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरवच झाला आहे. सरपंच चंद्रकांत भोईर,उपसरपंच सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी यांनी हा आयएसओ मानांकन पुरस्कार स्वीकारला.
जागतिक गुणवत्ता प्रणाली या चाचणीमध्ये ग्रामपंचायत पळस्पे सहभागी होऊन ग्रामपंचायतीने हे नामांकन प्राप्त केले आहे.देखणी ग्रामपंचायत इमारत,रस्ते, स्मशानभूमी,शासनाच्या विविध योजना तळा-गाळातील माणसांपर्यंत पोहोचविणे,बचत गटाची स्थापना करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे,केंद्र सरकारची पेयजल योजना, ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी- दलित कुटुंबासाठी मोफत पाणी पुरवठा आधी कामे ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली आहेत.या केलेल्या कार्यामुळेच पळस्पे ग्रामपंचायतला हा आयएसओ नामांकन प्राप्त झाला आहे. मिळालेल्या नामांकनामुळे सरपंच चंद्रकांत भोईर आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन होत आहे.
नामांकनामुळे जबाबदारी वाढली
- सरपंच चंद्रकांत भोईर
ग्रामपंचायतीने केलेल्या वेगवेगळ्या कामाची ही पोचपावती आहे,या नामांकनामुळे जबाबदारी वाढली असल्याचे सरपंच चंद्रकांत भोईर यांनी सांगितले.
Post a Comment