News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट कामोठेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे

जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट कामोठेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे

पनवेल (संजय कदम): कामोठे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांची बिनविरोध निवड तसेच उपाध्यक्षपदी आशिष बलदोटा,कार्याध्यक्षपदी स्वप्नील गुप्ते तर व्यवस्थापकपदी आर.एस.निकम यांच्यासह 13 जणांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारणी मंडळ हे सन २०२४ ते सन २०२९ पर्यंत कार्यरत राहणार आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांनी सांगितले कि, एकूण साठ एकर जागेमध्ये हि इंडस्ट्रियल इस्टेट असून अडीशे प्लॉट आहेत व एकशे वीस युनिट सध्या चालू आहेत. येथील औद्योगिक समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्यातील प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न,करांचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्रितपणे काम करून मार्ग काढू,शासनाच्या विविध योजना व धोरणे औद्योगिक क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आली आहे.त्यासंदर्भात शासनाकडे सुद्धा आवश्यक पाठपुरावा करू येथील कंपन्यांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी टाकी उभारण्याचे काम आम्ही आमच्या कार्यकाळात करू फायरचा प्रश्न सुद्धा सोडविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू अशी माहिती यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांनी दिली आहे.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment