पनवेल (संजय कदम) : श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ ते २२ जानेवारीदरम्यान पनवेल मधील ३६ मंदिरांमध्ये रामनाम जप करण्यात येणार आहे.त्यापार्श्ववभूमीवर सर्व मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक संपन्न झाली.
अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्न संपन्न व्हावा याकरिता श्री रामनाम सामूहिक जप संकल्प समिती पनवेलतर्फे पनवेलमधील ३६ मंदिरांमध्ये १५ ते २२ जानेवारी दरम्यान रोज संध्याकाळी सात ते साडेसात सामूहिक श्रीराम नाम जपाचे आयोजन केले आहे.त्याकरिता पनवेल मधील मंदिरांच्या विश्वस्तांची सीकेपी समाजाचे श्री लक्ष्मी नारायण मंदिरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व मंदिरांचे विश्वस्त मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाले होते. पनवेल मधील नागरिकांनी आपल्या घराजवळील मंदिरामध्ये जाऊन संध्याकाळी सात ते साडेसात या वेळेत होणाऱ्या रामनाम जपात सहभागी व्हावे व रामनाम सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.पनवेलमधील श्री मारुती मंदिर लाईन आळी,श्री लक्ष्मीनारायण मंदिर शिवाजी रोड, श्री विरूपाक्ष मंदिर शिवाजी रोड,श्री राम मंदिर (परदेशी), श्री राधाकृष्ण मंदिर टिळक रोड,श्री विठ्ठल मंदिर कापड बाजार, श्री दत्त मंदिर कापड बाजार,श्री ज्येष्ठराज मंदिर जोशी आळी, श्री मारुती मंदिर जोशी आळी,श्री मारुती मंदिर सदाशिव पेठ,श्री मारुती मंदिर सावरकर चौक,श्री बल्लाळेश्वर मंदिर,श्री नामस्मरण जप केंद्र, श्री रामेश्वर मंदिर, श्री जाखमाता मंदिर, श्री मारुती मंदिर महाराष्ट्र बँक, श्री बालाजी मंदिर, श्री विठ्ठल मंदिर शिंपी समाज, श्री कृष्णेश्वर मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर(जोशी) मार्केट कॉर्नर, श्री एशियाई मंदिर बालाजी हॉल, श्री गणपती मंदिर मिडल क्लास सोसायटी, श्री सर्वेश्वर मंदिर मिडल क्लास सोसायटी, श्री दुर्गा माता मंदिर मिडल क्लास सोसायटी, श्रीराम मंदिर वाणी आळी, श्री सत्यनारायण मंदिर, श्री संत गोरोबाकाका मंदिर कुंभारवाडा, श्रीकृष्ण मंदिर (दलाल) मिरची गल्ली, श्री कोळेश्वर मंदिर कोळीवाडा, श्री जरीमरी मंदिर कोळीवाडा, श्री शनी मंदिर टपाल नाका, श्री कानिफनाथ मंदिर टपाल नाका, श्री झुलेलाल मंदिर सिंधी पंचायत हॉल, श्री मारुती मंदिर के गो लिमये वाचनालय आणि श्री पंचमुखी मारुती मंदिर पेट्रोल पंप या मंदिरांमध्ये रामनाम जप करण्यात येणार आहे.
Post a Comment