श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव..पनवेलच्या चिपळे ग्रामपंचायतीचा फतवा... मटन,चिकन,मच्छी,देशी-विदेशी दारू विक्री करण्यावर बंदी
पनवेल- श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवादिवशी ग्रामपंचायत हद्दीत मटन,चिकन,मच्छी,देशी व विदेशी दारू विक्री करण्यावर पनवेलच्या चिपळे ग्रामपंचायतीने
बंदीचा फतवा काढला आहे.या ग्रामपचायतीबरोबर अजूनही ग्रामपंचायतचा फतवा निघण्याची शक्यता आहे.
अयोध्या येथे सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव होत असून पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिपळे पंचायतीच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा केला जाणार आहे.
तरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावातील मटन,चिकन, मच्छी तसेच देशी-विदेशी दारू विक्री करण्यासाठी बंदी केली आहे.संबंधित दुकानदारांनी अथवा मालकांनी मटन, चिकन,मच्छी विक्री दुकाने,चायनीज दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा ढाबा,दारू दुकाने कोणत्याही प्रकारे सुरू न ठेवता संपूर्ण बंद ठेवावी सर्व विक्रेते दुकानदार यांनी या सूचनेची दखल घेऊन श्रीराम उत्सव व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
Post a Comment