अत्रे कट्ट्यावर सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांचे आरोग्यावर बोलू काही कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल- दशकपूर्ती वर्षानिमित्त नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यावर सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांचे आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून भारत सरकारच्या आयुष विभाग उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले वैद्य सुविनय दामले हे या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत.
रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सिडको उद्यान,अरुणोदय हॉस्पिटल समोर,नवीन पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आचार्य अत्रे कट्ट्याचे प्रमुख अरविंद करपे यांनी सांगितले.
Post a Comment