सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हिल क्लब ऑफ गॅलक्सी न्यू पनवेलने राबविले विविध सामाजिक उपक्रम
पनवेल- आपली सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हिल क्लब ऑफ गॅलक्सी न्यू पनवेलने पनवेल आणि विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले.इनरव्हिल क्लब ऑफ गॅलक्सी न्यू पनवेलवतीने पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथे फळझाडांची लागवड करून त्यांच्या देखरेखीची सोय केली. पळसदारी येथे सीटीझन युनिटी फोरम.(C.U.F)च्या संयुक्त विद्यमाने १२०आंबा व इतर फळझाडांची लागवड केली.त्यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ.शितल फरांदे यांच्यासह कल्पना कोठारी,उल्का धुरी,साधना धारगळकर,सुनिता कांडपिळे,शितल वळंजू व इतर अनेक मान्यवर सदस्या उपस्थित होत्या.
क्लबतर्फे हॅप्पी स्कूलसाठी निवडलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, मार्केटयार्ड,पनवेल या शाळेला एक हजार लिटर पाण्याची टाकी बसवून देण्यात आली.इंटर डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट म्हणून नाशिक मधील ५ मतिमंद मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.क्लबने रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल ब्लड बँकेला अकरा हजार रकमेचा चेक मदत म्हणून डोनेट केला. परमशांती वृद्धाश्रम,तळोजा येथील जेष्ठ नागरिकांसाठी संगीत आणि गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.क्लबच्या सदस्या संविधा पाटकर आणि त्यांचे सहकारी यांनी नवी,जुनी हिंदी मराठी गाणी गायली.जेष्ठ नागरिकांनी सुद्धा गाणी गाऊन व नृत्य करून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.यावेळी सदस्यांनी केळी,बिस्किटे,किराणासामान जेष्ठांना दिले तसेच क्लबच्या सदस्या कल्पना कोठारी यांनी जेष्ठ स्रियांसाठी गाऊन व साड्यांचे वाटप केले व वृद्धांना शर्ट पँट देण्यात आल्या तसेच गोकुळाष्टमी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सुनिता कांडपिळे यांनी आश्रमातील जेष्ठ नागरिकांना भोजन दिले. रोटरी ब्लड बँक हॉल पनवेल येथे क्लबतर्फे अपोलो हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जॉइन्ट व हाडाची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शनपर डॉ. सिध्दार्थ यादव याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.त्यांनी क्नी रिप्लेसमेन्ट विषयी ५० वृद्धांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शिक्षकदिन पनवेल येथील मूकबधीर मुलांच्या शाळेतील शिक्षकांना व स्टाफ मेंबर्स ना ज्यूट बॅग्ज व काॅटन बॅग्ज भेट देऊन साजरा करण्यात आला.क्लबतर्फे रोटरी कम्युनिटी सेंटर, पनवेल येथील मूकबधिर मूलांच्या शाळेत क्लबच्या एडिटर शितल वळंजू यांनी तेथील मुलांना आकाशकंदील व भेटकार्ड बनविण्याची कार्यशाळा घेतली त्यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. शितल फरांदे कांडपिळे ,भूमिका परमार,सुनिता कांडपिळे ,सुनिता गुजर सदस्या उपस्थित होत्या.रॉबिन हूड आर्मी असोसिएशन स्कूल येथे रोटरी क्लब ऑफ होरिझनच्या संयुक्त विद्यमाने,डेंटल चेकअप कॅप आयोजित केला होता.क्लबच्या अध्यक्षा डाॅ.शितल फरांदे कांडपिळे यांनी ४० मुलांची दंत तपासणी करून मोलाचे मार्गदर्शन केले.
Post a Comment