पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवगेळ्या अपघातात ३ ठार
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवगेळ्या अपघातात तीन ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे .
पनवेलजवळील जेएनपीटी मार्गावरून मोटारसायकलवरून यतिक मेहता वय (२३ ) व त्याच्या सोबत निशा पासवान वय (२७) हे चालले असताना यतिक याचा मोटारसायकलवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या अपघातात पनवेल एस टी स्टॅन्ड जवळ श्रीवर्धन आगारातील एसटी बसची स्कुटी गाडीस धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव कथारे वय ( ३८ ) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या दोनीही अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Post a Comment