न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा : पारंपरिक आगरी-कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल - महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवारी (दि.२२) आहे.यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी माजी खासदार संजीव नाईक,आमदार रविशेठ पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल.ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर यांनी केले आहे.
Post a Comment