मुंबई ऊर्जा कंपनीविरोधात टेंभोडे येथे स्थानिक संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन
पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथे मुंबई ऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्याचे काम आजपासून सुरु होणार होते परंतु या कामाला विरोध करत स्थानिक ग्रामस्थांनी व स्थानिक संघर्ष समितीने ठिय्या आंदोलन छेडले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, सरपंच सुभाष भोपी, प्रकाश म्हात्रे आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. टेंभोडे येथील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीतीतून मुंबई ऊर्जा कंपनी टॉवरलाईन उभारत आहे.याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
सदर टॉवरलाईन बाजूच्या डोंगराळ भागातून न्यावी तसेच इतर मागण्यांसंदर्भात कंपनीबरोबर बैठका होऊन सुद्धा त्यांनी योग्य तो मार्ग काढला नाही व अचानकपणे आज काम सुरु केल्याने याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या नागरी प्रश्नावरून येत्या सोमवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते तरीही पोलीस बळाचा वापर करून मुंबई ऊर्जा कंपनीचे अधिकारी मिलिंद पाटील हे आजपासूनच काम सुरु करत असल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना तीव्र विरोध केला. ग्रामस्थांचा उद्रेक होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचे पथक तैनात होते.
Post a Comment