पिकअपने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू : पनवेल बायपासवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील घटना
पनवेल : पनवेल बायपासवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भरधाव जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.सोनू असे मृत्यू झालेल्याचे नाव असून ते (४२) वर्षीय आहेत.
येथील जय मल्हार हॉटेल समोर पिकअप ( एमएच ०१, ईई ३२२० ) चालक अन्वर एशराक अली हे चालवत होते. रात्री साडे आठच्या सुमारास ते भरधाव वेगाने पिकपअने चालवत असताना हा अपघात झाला.याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Post a Comment