मोठा खांदा येथील भंगार गोदामाला भीषण आग : आगीमुळे भीतीचे वातावरण
पनवेल : पनवेलजवळील मोठा खांदा येथील ट्रायसिटी सोसायटी व सद्गुरू युनिव्हर्सल सोसायटीच्यामध्ये असलेल्या मोकळ्या मैदानात अनधिकृतपणे उभारलेल्या भंगार गोडाऊनला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही आहे, आगीमुळे भीतीचे वातावरण झाले होते.
येथील सेक्टर १७ मधील दोन इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात बेकायदेशीररित्या अनधिकृत भंगार गोडाऊन उभारण्यात आले होते. येथील भंगार मालाला अचानकपणे आग लागल्याने आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात पसरत गेल्या.या गोदामात असलेले ड्रम, लोखंडी लाकडी व प्लॅस्टीच्या सामानामुळे आग चांगलीच भडकली होती. या आगीची झळ बाजूच्या सोसायट्यांना बसून तेथील गार्डनचे सुद्धा मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल, कळंबोली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले होते. व त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून हि आग आटोक्यात आणली या आगीत वित्त हानी झाली असली तरी कोणतीही जीवित हानी झालेली नाही आहे.
Post a Comment