शेकापक्षाचे एस.के.नाईक यांचा लवकरच भाजपात पक्षप्रवेश
पनवेल- पनवेलच्या शेतकरी कामगार पक्षाचे एस.के.नाईक हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.एस.के.नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदावर काम केले आहे.एस.के
नाईक यांच्यासोबत पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस.के.नाईक आहेत
शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पनवेलच्या मार्केटयार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे.
Post a Comment