News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मैत्री दिनानिमित्त मित्रांचे स्वच्छता अभियान: सावळे - देवळोली गावातील मित्रांचा उपक्रम

मैत्री दिनानिमित्त मित्रांचे स्वच्छता अभियान: सावळे - देवळोली गावातील मित्रांचा उपक्रम

पनवेल : (राज भंडारी) - जागतिक मैत्री दिवस आणि त्यात रविवार हा सुट्टीचा दिवस आल्यामुळे पनवेल परिसरातील सावळे - देवळोली गावातील मित्रांनी याच परिसरात असणाऱ्या उसरण धरणाजवळील परिसरासह उसराई देवीच्या मंदिर परिसराची स्वच्छता करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीतून ग्रामपंचायतीने त्यांचे कौतुक करून आभार देखील मानले. 

पनवेल तालुक्यातील सावळे - देवळोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उसरण धरण हे स्थानिक नागरिकांनी नेहमीच फुललेलं असतं. आणि पावसाळा सुरू झाला की याठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या देखील वाढते. यामध्ये लहान मुलांचा समावेश असतोच, परिणामी लहान मुले आपल्या हातातील खाऊचे रिकामी पाकिटे इतरत्र टाकत असल्यामुळे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात काही प्रमाणात कचरा जमा झाला होता. तसेच उसराई देवीच्या मंदिर परिसरात देखील तीच परिस्थिती होती. 

यावेळी देवळोली येथील तरुण मित्रांनी एकत्र येऊन मैत्री दिनानिमित्त स्वच्छतेची संकल्पना आखली, आणि ती प्रत्यक्षात देखील उतरविली. त्यांच्या या कृतीतून समाजाला बोध मिळावा या उद्देशाने सावळे - देवळोली ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने या तरुण मित्रांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. या मित्रांच्या समुहामध्ये प्रतिक (सोन्या) पाटील, दर्शन गव्हाणकर, तेजस पाटील, जितेश पाटील, साई पाटील, प्रतिक (भाया) पाटील, तुषार पाटील, भारत तांडेल, विशाल केदारी, योगेश केदारी यांचा समावेश होता. या सर्वांचे ग्रामस्थांच्यावतीने देखील कौतुक होत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment