इर्शाळवाडी ते कोकणभवन लॉंग मार्च : कुंभकर्णीय झोप घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी, आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
पनवेल- जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त इर्शाळवाडी आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी इर्शाळवाडी ते कोकणभवन लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन आदिवासी अधिकार संघर्ष समिती जिल्हा रायगड यांनी केले आहे.
बुधवार दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे श्रद्धांजली वाहून लॉंग मार्चला सुरू होणार आहे. या मोर्चामध्ये विविध मागण्या केल्या जाणार आहेत,त्यामध्ये खालापूर तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी,रायगड जिल्ह्यातील अति धरण प्रवण क्षेत्र खालील 86 वाड्यांचे पुनर्वसन करावे, इर्शाळवाडीचे सुसज्ज पुनर्वसन करणे,दुर्घटना बाधित्यांची 263 एकर दळी जमीन ती फॉरेस्टला वर्ग करून त्या बदल्यात पुनर्वसनाच्या बाजूला तिथल्या बाधित आदिवासींना स्वतंत्र सातबारासह वर्ग करून देणे,मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणे, निराधार झालेल्या मुलांना शासनाने दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये लावण्याची जबाबदारी घेणे,मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत देणे,दुर्घटनेत मृत्यू पावलेले आदिवासी बांधवांना सुसज्ज मृत्यूस्तंभ घटनास्थळावर बांधणे व सर्व मृतांची त्या स्तंभ स्थळावर नावे नोंदवणे, इरर्शाळवाडीतील येथील दुर्घटनेमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करत असताना शिवराम हुमणे यांना शहीद म्हणून घोषित करणे, 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा अशा अन्य विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Post a Comment