News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कामोठ्यात नवीन पाण्याची टाकी उभारा अन्यथा आमरण उपोषण करणार ठाकरे गटाच्या शिवसेनेचा इशारा

कामोठ्यात नवीन पाण्याची टाकी उभारा अन्यथा आमरण उपोषण करणार ठाकरे गटाच्या शिवसेनेचा इशारा

पनवेल (संजय कदम) : संपूर्ण कामोठे शहरात अनियमित तसेच कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे कामोठेवासियांसाठी नवीन पाण्याची टाकी उभारण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्यावतीने सिडकोचे कार्यकारी अभियंता प्रशांत चेहरे आणि कार्यकारी अभियंता प्रफुल देऊर यांना घेराव घालून नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी केली.अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे यांनी यावेळी दिला आहे.

गेल्या ४ महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असून सेक्टर ११, १२, १४, १६, १७, १८, ३४, ३५ आणि ३६ मध्ये तर सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत.अजून पण सोसायटीमध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त १ ते २ तास पाणी येत आहे. रोज आमच्याकडे तक्रारी येत असून रोज टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कामोठेमध्ये पाणीचा प्रश्न सुटण्यासाठी सिडकोची कामोठेमध्ये एकच पाण्याची टाकी आहे त्यामुळे कधी पाण्याच्या टाकीचे काहीही काम निघाले कि पाणी एक ते दोन दिवस कामोठेमध्ये पाणी येत नाही आणि कामोठेमधील पहिली लोकसंख्या खूप कमी होती आता तीच लोकसंख्या दुपटं झाली आहे ती त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो म्हणून विनंती आहे कि कामोठेमध्ये अजून एक नवीन पाण्याची टाकी उभारावी,अजून एक विनंती आहे कि,  पाणी सोडायची वेळ सकाळी आणि संध्याकाळी फिक्स ठेवावी त्यामुळे प्रत्येक सोसायटी ला कळेल कि आणि किती वाजता चालू करायचे.शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )उपशहर प्रमुख  सचिन त्रिमुखे यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत चेहरे आणि कार्यकारी अभियंता प्रफुल देऊर याना निवेदन देण्यात देऊन करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर यावर पर्याय काढावा अन्यथा रायगड भवन बेलापूर विभाग कक्षाजवळ ३१ ऑगस्ट २०२३ या रोजी आमरण उपोषण आणि अंदोलनाच्या करण्यात येईल असा इशारा दिला आहे. निवेदन देते वेळी कामोठे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख बबन गोगावले, शाखा प्रमुख सेक्टर17 अक्षय नवसकर, शहर संघटिका संगीता राऊत, प्रमोदनी राव, स्नेहा केळकर, सायली चाळके, अमिता कांबळे, जॉनी मतकर, राजेश जाधव, प्रभाकर इंदप,संतोष धोंगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment