पनवेल महानगरातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा होणार शुभारंभ : माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल :पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पालिका हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून आज कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथे प्राथमिक केंद्रांचा उद्घाटन केले जाणार आहे.
पनवेलमधील लोकसंख्या वाढत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत व त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी वारंवार आयुक्तांकडे केली होती. पालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आरोग्य सेवा व्यवस्थित ठेवून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी वारंवार लावून धरली होती. त्यानुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शुभारंभ केला जाणार आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रीतम मात्रे यांच्या मागणीला यश आले आहे. पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनीत ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांच्या पैशांची बचत होणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करावी अशी मागणी वारंवार केली होती. या मागणीला यश आले आहे.पालिकेमार्फत कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनीत तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होत आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा -
प्रितम म्हात्रे,
माजी विरोधी पक्षनेते,
पनवेल महापालिका
Post a Comment