News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन इसमाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन इसमाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक

पनवेल (संजय कदम) : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या एका नायजेरियन इसमाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थासह इतर मुद्देमाल जप्त केले आहे.   

पनवेल शहरातील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओपन जिमजवळ एक नायजेरियन इसम मेथॅक्यूलान (MD) हा अंमली विक्री करता येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून विक्री करणाऱ्या करता आलेला एक नायजेरियन इसम अगू पास्कल उर्फ केलेची ओंलमा (वय 24 वर्ष) व खरेदी करता आलेला एक इसम शहाबाज फिरोज एलुकर (वय 29) वर्ष यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता नायजेरियन इसमकडे 27 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आला.याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क), 22 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment