पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे पदपथावर दुकानदारांची अतिक्रमणे
पनवेल : पनवेल शहर व परिसरात अनेक दुकानदारांनी पदपथावरच आपल्या दुकानातील माल डिस्काउंटमध्ये विक्रीस काढण्यासाठी ठेवल्याने पदपथावरच त्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना पुटपाथवरून चालायला सुद्धा मिळत नाही.या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी सुद्धा कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक भागामध्ये दुकानदारांनी आपल्या दुकानातील साड्या,ड्रेस मटेरियल, ड्रेसेस व इतर वस्तू सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सेलच्या नावाखाली दुकानाच्या बहर पदपथावरच विक्रीस ठेवले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ नाहीत.त्यातच शहरातील पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालायला जागा नसल्याने नाइलाजास्तव रस्त्यावर चालावे लागत आहे.पालिकेने हे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.दुकानांचे जाहिरात फलक,पुतळे आदींचे अतिक्रमण शहरात पाहावयास मिळत आहे. तरी या दुकानदाराविरोधात अतिक्रमण विभाग का कारवाई करत नाही ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
Post a Comment