डॉ.मानसी मोरे मेडिकल फाउंडेशनतर्फे धोदाणी येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर : आदिवासी बांधवांचा प्रतिसाद
पनवेल- डॉ.मानसी मोरे मेडिकल फाउंडेशन,एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन व आयरिस आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सौजन्याने आदिवासी बांधवांकरीता धोदाणी पनवेल येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबिर घेण्यात आले.
शिबिरामध्ये साधारण १४५ लोकांनी सहभाग घेतला व त्यामध्ये १६ जणांना मोतीबिंदूचा आजार असल्याचे आढळून आले.संबंधित रुग्णांना आयरिस आय हॉस्पिटल पोदी नं १,सेक्टर १५,नवीन पनवेल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.शिबिरामध्ये आलेल्या सर्व लोकांची योग्य तपासणी नेत्ररोग तज्ञ डॉ.मानसी शेळके(मोरे) आणि छाती व क्षयरोग तज्ञ डॉ.मृण्मयी मयेकर यांनी केली व ज्यांना गरज आहे अशा ११७ लोकांना मोफत चष्मे वाटप, मोफत आय ड्रॉप्स व मोफत औषधे वाटप करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल व नर्सिंग एज्युकेशनचे डायरेक्टर श्री आर्यन शेळके व कॉलेजमधील शिक्षक वर्ग अनिल मखामले, सौ संघमित्रा हिवाळे,कॉलेजमधील शिक्षकेत्तर व विद्यार्थी वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.धोदाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.दामोदर रामा चौधरी, श्री.सीताराम जानु चौधरी,श्री.कैलास शंकर घुटे व श्री.पद्माकर रामा चौधरी (तलाठी सजा मालढुंगे कोतवाल),श्री.नारायण भाऊ चौधरी(पोलिस पाटील) यांच्या योगदानामुळे अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला.
Post a Comment