आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे समाजाला भूषण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान
पनवेल-आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात शेकडोंच्या उपस्थीतीत संपन्न झाले. समाजाला भूषणावह असणाऱ्या अर्थात पोलीस अधिकारी ,प्रशासकीय अधिकारी ,डॉक्टर अशा विभूतींचा सन्मान करण्यात आले.मान्यवरांच्या शुभहस्ते संघटनेच्या झेंड्याचे अनावरण सुद्धा करण्यात आले. संघटनेचा प्रवास व वाटचाल प्रवक्ते विवेक भोपी यांनी सर्वांपुढे नमूद केले.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते दि.बा.पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, श्री.राम पाटील (नासा शास्त्रज्ञ), श्री.राजू मुंबईकर (महाराष्ट्र भूषण),करंजाडे सरपंच मंगेश शेलार,श्री.अनिल ढवळे (आदर्श ग्रामपंचायत माजी सरपंच), संघटनेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रुपेश धुमाळ ,उपाध्यक्ष श्री.भारत भोपी व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्याध्यक्ष रोहन पाटील यांच्या नियोजनात वर्धापनदिनाचे कार्यक्रम उभारले.सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील व आभार प्रदर्शन राज्य संघटक किरण पवार यांनी केले.
ध्यास समाजाच्या अस्तित्वाचा हे ब्रीदवाक्य घेऊन संघटना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर राहील अशी भूमिका नेहमीप्रमाणेच संघटनेकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आली.
Post a Comment