News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आपटा जवळील माडभुवन ठाकूरवाडी येथील डोंगराला भेगा : माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार-आमदार महेश बालदी

आपटा जवळील माडभुवन ठाकूरवाडी येथील डोंगराला भेगा : माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार-आमदार महेश बालदी

पनवेल- पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ठाकूरवाडी शेजारी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याने येथील आदिवासी बांधवांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.

डोंगराला भेगा पडल्याच्या घटनेने शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सतर्क झाले असून माडभुवन ठाकूरवाडी येथील ९१ कुटुंबे डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत.या वाडीचे लवकरच पुनर्वसन करणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी या वाडीतील ग्रामस्थांना भेटून सांगितले.९१ कुटुंबातील ४०८ नागरिकांचे कर्नाळा गार्मेंट्स फॅक्टरी येथे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्या राहण्याची,अन्नसेवेची आणि विजेची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला.त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनाला सूचना केल्या.त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दखल घेत माडभुवनवाडीचे स्थलांतर करण्यात आले.यानंतर आमदार महेश बालदी यांनी या आदिवासी बांधवाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.
सारसई माडभुवनवाडीलगत असलेल्या डोंगराला तडे जात असल्याची बाब येथील ग्रामस्थांनी माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी तत्काळ दखल ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचित केले. यानंतर दुसर्‍याच दिवशी माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना घेऊन डोंगरावर चढून नैसर्गिक पडलेल्या भेगांची पाहणी केली. लगेचच जवळच असलेल्या कर्नाळा गार्मेंटचे रिकाम्या इमारतींमध्ये सुव्यवस्था करून सारसई माडभुवन आदिवासीतील सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.यानंतर आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह या आदिवासी बांधवांना भेट दिली.त्यांच्याशी संवाद साधला.सारसई माडभुवन परिसरातच वैतागवाडी येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे असे वाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे,परंतु काही जागा वनखात्याच्या तर काही जागा ह्या सरकारच्या अखत्यारीत आहेत.त्यामुळे या जागांचा सर्व्हे करून तेथे योग्य सुविधायुक्त पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले.

यावेळी ते म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्यावतीने मी शासनासोबत चर्चा करणार आहे. तुम्ही निवडेल्या जागा, त्याचा सर्व्हे नंबर इत्यादीबाबत राज्य शासनाकडे या आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येईल.पुनर्वसन होणार्‍या ठिकाणी सरकारने मुलभूत सोई सुविधा द्याव्यात.याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मी हा प्रस्ताव सादर करून तो लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन महिन्यांत आपण कागदोपत्री पुर्तता करून ऑक्टोबरमध्ये जर घरांचे काम सुरू झाले तर पुढच्या पावसाळ्याच्या आतमध्ये राहायला जागा देऊ. आमदार महेश बालदींसोबत 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर,भाजपचे तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी कराडे खुर्द माजी सरपंच विजय मुरूकुटे, केळवणे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, कराडे खुर्द माजी सरपंच किरण माळी, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी, आपटा माजी सरपंच दत्ता पाटील, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, मनिषा वाघे, संदिप पाटील,केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष सुशिल ठाकूर, कर्नाळा माजी सरपंच राजू पाटील, शेखर कानाडे,केळवणे भाजप नेते रवींद्र माळी,अमित पाटील, दत्ता भोईर योगेश मुरकुटे आदी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment