News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कळंबोली येथे शिवसेनेचा महिला मेळावा : शिवसेना महिला सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

कळंबोली येथे शिवसेनेचा महिला मेळावा : शिवसेना महिला सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

पनवेल- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथील सुधागड हायस्कूल येथे शिवसेनेचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मेळाव्याला महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.पनवेल आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत पक्ष प्रवेश सुरू आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना महिला सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांनी उत्फुर्त पक्षप्रवेश करून शिवसेनेचा भगवा हातात घेतला. 

आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने हे पक्ष प्रवेश पनवेलमध्ये शिवसेनेला पनवेलमध्ये बळकटी देईल असा विश्वास कळंबोली येथे पक्षाच्यावतीने भव्य महिला मेळावा ठेवण्यात आला होता. यावेळी शेकडो महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शिवसेना सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या मुख्य उपस्थितीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड जिल्ह्याची पदांची नेमणूक करण्यात आली.यावेळी संध्या पाटील,ज्योती पाटील, गणेश वत्रे,विशाल देवरे, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक,रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके,आनंद माने,सुखदेव सस्ते,आबासो लाकडे ,विराट पवार,सुधीर ठोंबरे,सुभाष घाडगे इत्यादी मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment