सारा हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी : संतप्त जितेकरांचे उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन
पनवेल- पेण तालुक्यातील जिते गावातील सारा रमेश ठाकूर (वय १२) हिला सर्पदंश झाला होता परंतु पेणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे निष्पाप मुलीला आपला जीव गमावा लागला,या विरोधात रुग्णालयाचा निषेध करत समस्त जितेकरांनी ठिय्या आंदोलन केले.
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळत नसल्याचे वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे तरी सदर प्रश्नाकडे शासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने सारा सारख्या मुलीला आपला जीव गमवावा लागला.
जिथे गावचे ग्रामस्थ लीलाधर म्हात्रे यांनी ठिय्या आंदोलनाची हाक दिल्यानंतर या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर विजय पाटील नंदा म्हात्रे दिलीप पाटील काशिनाथ पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनातील मागण्या पुढिलप्रमाणे ...
१) सारा हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी सारा हिच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
२)उपजिल्हा रूग्णालयात कोण कोणते उपचार आरोग्य सेवा देण्यास मान्यता आहे व कोण कोणते उपचार आरोग्य सेवा देण्यात येत नाहीत त्याची कारणे काय आहेत ह्याचा अहवाल तयार करून तो नागरीकाच्या माहिती करता प्रसिध्द करावा व त्याची एक प्रत माहितीकर्ता आम्हाला देण्यात यावी
३) रूग्ण कल्याण समितीची प्रत व गेल्या ५वर्षात झालेल्या सर्व बैठकींचे प्रोसिडींगची प्रत मिळावी
४)पेण उपजिल्हा रूग्णालयातील स्त्रीरोगतदन्य , बालरोगतद्य्न , शल्यचिकीत्सक , भूलततद्य्न , यांच्या जागा तत्काळ भराव्यात
५)पेण उपजिल्हा रूग्णालयात दंतचिकीत्सक आहेत परंतु त्यास अवश्यक यंत्रसामग्री नसल्याने उपचार दिले जात नाहीत तरी तत्काळ दंतविभागास आवश्यक यंत्र सामग्री एक्सरेमशीन व अन्य औषध उपलब्ध करून दातांसंबधीत सर्व प्रकारचे उपचार सुरू करावे
६) उपजिल्हा रूग्णालय पेण व जिल्हारूग्णालय अलिबाग येथे शल्यचिकीत्सक नसल्याने सदर आरोग्य सेवा मिळत नाहीच त्याव्यतिरिक्त अपंगाना अपंगत्वाच्या दाखल्यांकर्ता मुंबई येथील जेजे रूग्णालयात पाठविले जाते तरी सदर दाखले देण्याच्या दृष्टीने खाजगी शल्यजिकीत्सकांचा दाखला मिळण्याच्या दृष्टीने सेवा घेण्यात यावी किंवा सध्या कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी यांना सदर रूग्णांची अपंगत्वाची टक्केवारी ठरवून त्यांचा दाखला मान्य करण्याच्या सूचना जिल्हा समाजकल्याण विभागाला देण्यात याव्यात जेणेकरून अपंगाना दाखला नसल्याने अपंगासाठीच्या लाभाच्या योजनांची लाभ मिळण्यात अडचण येणार नाही
७) सदर मागण्याच्या पूर्ततेबाबत उपविभागीय अधिकारी पेण यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा शल्यचिकीत्सक अलिबाग रायगड यांचे प्रमुख उपस्थितीत वरील मागण्याच्या कारवाई संदर्भात येत्या ५ दिवसात आंदोलनकरत्यां समवेत बैठकीचे आयोजन करावे.
Post a Comment