पनवेल तहसीलदारपदाचा विजय पाटील यांनी पदभार स्वीकारला
पनवेल : पनवेल तहसीलदारपदाचा विजय पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांच्या वैद्यकीय कारणास्तव रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे,त्यानुसार विजय पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला.
पदभार सोडलेल्या तहसीलदार विजय तळेकर यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कामकाजाची पनवेलमध्ये चर्चा आहे.विजय तळेकर यांनी कार्यकाळ सांभाळाल्यापासून प्रशासकीय पातळीवर विविध सकारात्मक निर्णय घेतले.विशेष म्हणजे कोविड काळातील तळेकरांचे कार्य उल्लेखनीय राहिले.संजय गांधी निराधार योजना शाखेच्या माध्यमातून देखील लाभार्थाना अनुदानाचे वितरण,तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या याबाबत सकारात्मक कार्य केले.शेवटच्या टप्प्यात पळस्पे येथील ग्रामस्थांचा उपोषण सोडविण्याच्या दृष्टीने सिडको अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मार्गी लावला.कार्यतत्पर अधिकारी म्हणून तळेकरांनी पनवेलकरांमध्ये आपली ओळख निर्माण केली.
Post a Comment