तळोजाच्या भुयारी मार्गात साचत असलेला पाणी प्रश्न लवकरच कायमस्वरूपी सोडण्याचे रेल्वेचे आश्वासन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची रेल्वे कार्यालयावर धडक
पनवेल- तळोजाच्या भुयारी मार्गात साचत असलेला पाणी प्रश्न लवकरच कायमस्वरूपी सोडण्याचे आश्वासन रेल्वे विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.
रेल्वे विभाग पनवेलचे कार्यपालक अभियंता उदय होलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासम भाई मुलानी,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव कुंडलिक नेटके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला जिल्हा सरचिटणीस संगीता ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तळोजा फेज वन येथील भुयारी मार्गामध्ये पाणी जमा होऊन नागरिकांना नेहमीच त्रास होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले.
पनवेल रेल्वे विभागाचे कार्यपालक अभियंता उदय होळकर यांनी सदरचा प्रकार खरोखरच गंभीर असल्याचे सांगितले,लवकरच सिडको अधिकारी,एमएसईबी अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत एक संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येऊन तळोजा भुयारी मार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याबाबत उपाययोजना करण्यात येईल असे झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले.लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून तळोजा भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासंमभाई मुलानी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अन्यथा नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या न्याय हक्कासाठी तीव्र लढा उभा करण्यात येईल असा इशारा दिला.
झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी समाधानकारक चर्चा केल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव नेटके कुंडलिक यांनी आभार मानले.
Post a Comment