संभाजी भिडे यांचा पनवेल जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने घोषणा देत तीव्र निषेध
पनवेल- शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.पनवेलमध्ये ही पनवेल जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने भिडे गुरुजी यांचा निषेध आंदोलन करण्यात आले.पनवेलच्या काँग्रेस भवन येथील कार्यालयासमोर महिलांनी घोषणा देत भिडे गुरुजी यांचा तीव्र निषेध केला.
या निषेध आंदोलनात पनवेल जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे तसेच सरोज ढाकी,निता शेणॉय,रेश्मा खान व महिला बचत गट सदस्या या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
Post a Comment