News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आला पावसाळा ..साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता : काळजी घ्या महापालिकेचे आवाहन

आला पावसाळा ..साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता : काळजी घ्या महापालिकेचे आवाहन

पनवेल : पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते.नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारी विषयी जनजागृती विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी  दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. 

पावसाळ्यामध्येअनेकवेळा दूषित पाण्यामुळे कॉलरा , गॅस्ट्रो,विषमज्वर असे जलजन्य रोग होण्याची भिती असते त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे तसेच भाज्या,फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात.सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा.घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा.आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी.साचलेले पाणी ,डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी जेणे करून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करूनच पिण्यास वापरावे.अतिसार झाल्यास क्षारसंजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट,वॉटरकूलर इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक वेळा पुर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा ,अशा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनी केले आहे.
जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले,ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणेअसल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

स्वाईन फ्ल्यू हा हवेमार्फत होणारा आजार आहे. ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसार उलट्या,श्र्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. हस्तांदोलन ,सार्वजनिक थुंकणे टाळावे, या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. तसेच लेप्टोस्पायरोसीस हा देखील विषाणूजन्य आजार आहे.रोगबाधित प्राणी यांच्यामुळे दूषित झालेल्या पाण्यातून या आजराचे विषाणू संसर्ग करतात. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, डोळे सूजणे, लक्षणे यामध्ये आढळतात. तसेच गंभीर रूग्णांमध्ये मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडू शकते.  त्यामुळे पाण्यातून जाताना रबरी बूट, हातमोजे वापरावे. दूषित माती, पाणी, भाज्यांशी सपंर्क टाळावा. 

     हिवताप,डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया,मलेरिया असे साथीचे रूग्ण आपल्या आसपास आढल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी  किंवा रूग्णालयाशी संपर्क साधावा. रूग्णालयांनी, प्रयोगशाळांनी साथीच्या रोगाचे रूग्ण महापालिकेला  panvelmoh@gmail.com या ईमेलआयडीवरती कळवावे असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment