सीकेटी माध्यमिक विद्यालयात विठ्ठल नामाची बालभक्तांची वृक्षसंवर्धनाची 'आषाढी एकादशी' साजरी
पनवेल- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी पालखी सोहळा,वृक्षदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी,पालखी सोहळा, वृक्षारोपण,अभंग,गजर अशा कार्यक्रमाचे आयोजन विद्याथ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात केले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव एस.टी.गडदे,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक निशा वैदू यांच्या हस्ते पालखी पूजन झाले,संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिमा पूजन झाले,पारंपारिक पद्धतीने काढलेल्या दिंडीमुळे शाळेला जणू पंढरीचे स्वरूप आल्यासारखे भासत होते. विद्याथ्यांनी केलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने हा सोहळा अधिक रंगला,विठ्ठल नामाच्या गजराने सोहळा बहरला, वृक्षारोपण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांस वृक्षसंवर्धनाचे महत्व समजले.
आषाढी एकादशी वृक्षदिंडी पालखी सोहळा विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे तसेच उच्च माध्यमिक विद्यालायचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंगजी माध्यम- माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यम- प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर ,निलिमा शिंदे , वैशाली पारधी अन्य विभाग प्रमुख कार्यक्रमास उपस्थित होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर,व्हाईस चेअरमन वाय. टी.देशमुख,अध्यक्ष अरुणशेठ भगत ,सचिव एस.टी.गडदे ,श्रीमती निशा वैदू, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्निरोड मुंबई तसेच संस्थेचे संचालक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 'आषाढी एकादशी पालखी सोहळयाच्या माध्यमातून विद्यार्थी सहभागास प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
अशा तऱ्हेने विठ्ठल नामाची बालभक्तांची वृक्षसंवर्धनाची 'आषाढी एकादशी' संपन्न झाली.
Post a Comment