News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये योग दिन साजरा

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये योग दिन साजरा

पनवेल - नवीन पनवेल-खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये योग दिन साजरा करण्यात आला.या योग दिन कार्यक्रमास योग प्रशिक्षक श्रद्धा हिरे,महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या धनश्री कदम उपस्थित होत्या.

महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा होता.योग प्रशिक्षक श्रद्धा हिरे यांच्या नेतृत्वाखाली या योग विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक प्राध्यापक राघव शर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात,संतुलित आणि निरोगी जीवनशैली साधण्यासाठी योगाचे महत्त्व सांगितले. 
प्रभारी प्राचार्या धनश्री कदम यांच्या हस्ते श्रद्धा हिरे यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आले.आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून योगाच्या सरावातून सर्वांगीण कल्याणासाठी कॉलेजची बांधिलकी अधोरेखित केली.शारीरिक आणि मानसिक सामंजस्य राखण्यासाठी योगासने आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा महत्त्वाची आठवण करून देणारा हा उपक्रम ठरला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिना हाशिम तर प्रमुख पाहुण्यांची ओळख संध्या कांबळे,आभार प्रदर्शन यास्मिन सिद्दिकी यांनी केले. 

या कार्यक्रमास सहाय्यक प्राध्यापक रवनीश बेक्तर ,डॉ. ममता गोस्वामी,भाग्यश्री कांबळे, अपराजिता गुप्ता, सागर देवघरे एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर राघव शर्मा उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment