एसटी को ऑप.कर्मचारी बँक निवडणूक : महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्या पॅनलकडून संचालकपदासाठी विजय कोळी निवडणूक रिंगणात
पनवेल- राज्यातील एक अग्रेसर आणि सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली असणारी महाराष्ट्र एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२३ - २०२८ वर्षाकरताच्या संचालकपदाचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीसाठी एकूण ८४ हजार सभासद संख्या असलेल्या कर्मचऱ्यांमधून १९ संचालक निवडले जाणार आहेत. सदरची निवडणूक ही २३ जून २०२३ रोजी होणार आहे.
मुंबई,रायगड या दोन जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून पनवेल आगारात गेली १८ वर्ष काम करणारे श्री विजयकुमार संभाजी कोळी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या पॅनलकडून उमेदवार म्हणून लढत आहे.अतिशय सर्व सामान्य कुटुंबामधून तयार होत असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून विजय कोळी यांच्याकडे पाहिले जात आहे.गेली ६ वर्ष मुंबई विभागीय सचिव म्हणून आजपर्यंत संघटनेमध्ये काम करत आहेत. नेहमीच एस.टी. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रशासनाशी भांडण करुन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.अतिशय नम्र स्वभाव , संयमी, इतरांच्या मदतीला धावून जाणारे आणि विचारवंत अशा प्रकारचा उमेदवार महामंडळ बँकेच्या संचालकपदावर पाठवला तर नक्कीच भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक हक्काचा माणूस म्हणून कुठलाही प्रकारच्या संदर्भात ते नक्कीच काम करतील यात शंका नाही, अशी भावना सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सामजिक क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात विजय कोळी आजपर्यंत विविधक्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहतात.१० वर्ष बँक क्षेत्रामधील त्यांचा अनुभव पाहता त्यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे मुंबई , रायगडसह सर्व राज्यभरातील विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जवळपास ८४ हजार मतदारमधून १९ संचालक एस. टी.कामगार बँकेच्या संचालक पदावर निवडण्यात येणार असून सर्व ग्रामीण व शहरी भागातील असे कर्मचारी , अधिकारी यांनी आपले बहुमूल्य असे मत श्री विजय कोळी आणि महाराष्ट्र एस. टी.कामगार संघटनेच्या पॅनलला देऊन सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी विजय कोळी मित्रपरिवार मुंबई आणि रायगड जिल्हा यांच्यावतीने करण्यात आली आहे.
Post a Comment