पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आ.मंगेश चव्हाण,पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा
पनवेल- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन वाढ आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये पोलीस पाटलांचा विषय मार्गे लागेल याबाबत ठोस आश्वासन राज्याध्यक्ष यांना देण्यात आले.
आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार यासाठी महत्त्वाचा आहे मागील २२ डिसेंबरच्या मोर्चामध्ये त्यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन केले होते आणि त्यांनी पाठपुरावा सुद्धा चालू केला होता. यावेळी राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, श्री कमलाकर मांगले पाटील राज्य सचिव, श्री निळकंठ थोरात पाटील खजिनदार ,जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे पाटील ,आमचे सहकारी मित्र श्री दीपक चौधरी पाटील श्री किशोर भदाने पाटील, तालुकाध्यक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री पप्पू काका राक्षे पाटील ,श्री गुलाब मि॓ढे राज्य सरचिटणीस, श्री विजय कुंजीर पाटील पुणे जिल्हा कार्याध्यक्ष,श्री बाजीराव पवार पाटील कामशेत ,राज्य संघटक मा.श्री. हरिश्चंद्र दुदुस्कर, उपाध्यक्ष श्री दिनेश पाटील रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चेरफले साहेब , जिल्हा सचिव- .श्री. कुणाल लोंढे , जिल्हा संघटक रायगड- श्री गणेश ढेणे पाटील , कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री. डायरे पाटील कोकण सदस्य महेश जांभळे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सरिताताई रणपिसे,रायगड जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सौ.सान्वीताई चव्हाण,नांदेड जिल्हा अध्यक्ष भास्कर कंकाळ पाटील,श्री प्रवीण गोसावी पाटील खानदेश विभाग अध्यक्ष, श्री जीवन पाटील चाळीसगाव तालुका अध्यक्ष ,श्री रवींद्र पाटील श्री हेमराज पाटील कार्याध्यक्ष जळगाव, श्री रावसाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, श्री विजय पाटील तसेच राज्यातील अनेक पोलीस पाटील आजच्या बैठकीला हजर होते.
गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांचा पाठपुरावा राज्यातील पोलीस पाटील भक्कम बाजू आहे लवकरच पोलीस पाटलांच्या पदरी मानधन वाढीच्या आनंदाची बातमी राज्यातील पोलीस पाटलांना मिळेल.
Post a Comment