पळस्पे गावाजवळ जिल्हा परिषद शिक्षिकेचा अपघाती मृत्यू : मुलाच्या वाढदिवशी आईवर काळाचा घाला
पनवेल- पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गिरवले शाळेच्या शिक्षिका ललिता ओंबळे यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे गावाजवळ आपल्या शाळेत जाताना आज सकाळी अपघाती निधन झाले. त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तब्येत बरी नाही तू आज शाळेत जाऊ नकोस असे पतीने सांगितले परंतु शाळेत जावे लागेल म्हणून त्या सकाळी शाळेत निघाल्या .... आणि आज सकाळी त्यांचा मुलगा आयुष याचा वाढदिवस ... त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ललिता ओंबळे आपल्या शाळेत दुचाकीने निघाल्या.शाळेत जाताना पळस्पे गावाच्या हद्दीत त्यांना एका दुचाकी स्वाराने कट मारली,त्यात त्यांचा तोल गेला त्या रस्त्यावर पडल्या आणि याच या एकेरी मार्गावरून भरधाव येणाऱ्या कंटेनरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्या या अपघाती निधनाने पनवेल आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment