आरोही धायगुडे नवोदयमध्ये टॉप! : रायगडमध्ये पटकावली फर्स्ट रँक
पनवेल :- केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेत कामोठे येथील आरोही रुक्मिणी ललितकुमार धायगुडे हिने रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिथे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मेरिट लिस्टमध्ये सर्वात अगोदर आरोही हिने आपले नाव कोरले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय ही शंभर टक्के केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात.यात प्रवेशासाठी कमालीची स्पर्धा असते.त्याकरीता प्रवेश परिक्षा घेतली जाते.अतिशय आव्हानात्मक असलेल्या या परिक्षेच्या गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नवोदय केंद्रीय विद्यालय आहे.दरवर्षी फक्त 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही दिवसांपूर्वी याकरता प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
यामध्ये रायगड जिल्ह्यात कामोठे येथील आरोही रुक्मिणी ललितकुमार धायगुडे या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादी प्रथम स्थान मिळवले. विशेष म्हणजे आरोही सर्वसाधारण प्रवर्गातून टॉपर आली आहे. कामोठे येथील प्रख्यात दंतचिकित्सक डॉ.रुक्मिणी धायगुडे व मंत्रालयातील कक्ष अधिकारी डॉ ललितकुमार धायगुडे यांची आरोही ही कन्या आहे. खारघर येथील विश्व ज्योत हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे.त्याचबरोबर कळंबोली येथील आय कॅन इन्स्टिट्यूटमध्ये ज्ञानवंत गुणवंत यशवंत आरोही धायगुडेला मार्गदर्शन मिळाले. या माध्यमातून तिने पनवेल तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
Post a Comment