रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप,महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली असून या निवडणुकीकरता आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप,महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक करिता शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्यासह अनेक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागच्या शेतकरी भवन ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी हजारोंच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकाप, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.या निवडणुकीसाठी शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील,नृपाल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुरेख खैरे,एकनाथ गायकवाड, प्रभाकर पाटील, वसंत यादव, संतोष पाटील, प्रवीण लाले, अस्लम राऊत, विजय गिदी, गणेश मढवी, ज्ञानेश्वर भोईर, हनुमंत जगताप, महेश म्हात्रे, तानाजी मते, संतोष पाटील, किसन उमटे, अजित कासार, प्रिता चौलकर, मधुरा मधुष्टे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
Post a Comment