पनवेल एसटी स्टँड समोरील उड्डाणपुलावरून उड्डाणपुलाखाली पाण्याच्या धाराच ..धारा : अमरधाम स्मशानभूमी समोर पाणीच पाणी ....
पनवेल- पनवेल एसटी स्टँड समोरील उड्डाणपुलावरून उड्डाणपुलाखाली पाण्याच्या धारा जोरात कोसळत आहेत. या उड्डाणपूल खालच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा विशेषतः दुचाकी वाहनांचा अपघात होऊ शकतो. पनवेलच्या ठाणा नाक्याहून अमरधाम स्मशानभूमीकडे येणाऱ्या मार्गावर अमरधाम स्मशानभूमी समोर पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.
पाण्याचा निचरा व्हावा म्हणून यंत्रणेने उड्डाणपुलाला पाईपलाईन टाकली आली आहे,त्यातून पाणी खाली पडते. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सुरुवातीसच पाईपलाईनच्या जोडण्या निघाल्या आहेत तर काही ठिकाणी पाईप फुटले आहेत,त्यामुळे संपूर्ण उड्डाणपुलाखाली उड्डाणपुलावरून पाण्याच्या धाराच धारा कोसळत आहेत. उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी या धारा जोराने कोसळत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या मार्गावरच या धारा कोसळत असल्याने वाहतुकीचा अडथळा ही होत आहे.वाहतुकीच्या गाड्यांवर जोरात धारा पडत असल्याने आवाजही मोठा येत आहे.उड्डाणपुलाखालून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक जणांना हा त्रास सहन करत आपला प्रवास करावा लागत आहे.
अमरधाम स्मशानभूमीसमोर
पाणीच पाणी ....
पनवेलच्या ठाणा नाकावरून अमरधाम स्मशानभूमीकडे येणाऱ्या मार्गावर अमरधाम स्मशानभूमीसमोर पाणीच पाणी साचले आहे. लहान मोठ्या वाहनचालकांची चांगलीच तारांबळ होत आहे.पाण्याचा निचरा होत नसल्याने कालपासून पाणी साचले आहे. येथील वाहतूक संथगतीने असून वाहन चालकांना वाहने चालवण्यास त्रास होत आहे. यंत्रणेने पाणी काढण्याच्या मोटर लावले आहेत परंतु पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने त्याला वेळ लागत आहे.
Post a Comment