उरण-पनवेलकर महावितरण मनमानी किती सहन करणार? : मनसे उत्तर रायगड जिल्हा पनवेलच्या महावितरण कार्यालयाला देणार धडक
पनवेल- उरण-पनवेलच्या विजेच्या विविध समस्यांबाबत महावितरण कार्यालयाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली जाणार आहे .
सोमवार दिनांक १९ जून २०२३ रोजी पनवेलच्या भिंगारी येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून पनवेल-उरण भागातील विजेच्या विविध प्रश्न संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे.विजेचा लपंडाव, ग्राहकांना जादा रकमेची बिले,भारनियमन, विजेच्या तारांवर पडणाऱ्या फांद्यांची छाटणी अशा विविध ग्राहकांच्या तक्रारी संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे.
Post a Comment